Tag Archives: devendra fadnavis

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘केंद्राला भेटून फायदाच नाही’ महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही चांगले!

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता आहे. देशातील अन्य राज्यात ते आरक्षण सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्ग आयोग गठीत करून पुढील कारवाई …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकमेकांशी सहजरीत्या भेटणे इतके सोपे नाही. मात्र भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या …

Read More »

आदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले! अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

नागपूर-मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. हे सांगत असताना कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे सांगत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणुन मागील दिड वर्षात सरकार मागासवर्गीय समाजाचे संवैधानिक चौकटीतील निर्णय घेत नाही हे दिसून …

Read More »

केंद्राच्या फेरविचार याचिकेत मराठा आरक्षणाचा उल्लेखच नाही: राजेंना वेळ द्या पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याचे आवाहन- मंत्री अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये ‘मराठा आरक्षण’ या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ १०२ व्या घटनादुरुस्ती पर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला ‘एसईबीसी’ आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या …

Read More »

ओबीसी आरक्षण : आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र विधानसभेतील …

Read More »

तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम दिल्लीत मराठा गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …

Read More »

मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपाची रसद- काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा …

Read More »

फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

सर्वसामान्यांमध्ये जाताना नवे बूट खरेदी करावे लागणे यासारखे आश्चर्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तोक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. यावेळी प्रसिद्ध …

Read More »