चार दिवसानंतर राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे गेला…आणि मंजूर ही वनमंत्री संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर

मुंबईः प्रतिनिधी

बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यां मंजूर केल्याची माहिती राजभवनाकडून कळविण्यात आली.

संजय राठोड यांच्यासोबतचे पूजा चव्हाण हिचे अनेक फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले. तसेच पूजा चव्हाण बरोबरील मोबाईल फोनवरील संभाषण व्हायरल झाले. त्यामुळे चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले. यामुळे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अनेक नेत्यांनी वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करत राज्यभरात धरणे आंदोलने केली.

त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राठोडांचा राजीनामा न घेतल्यास विधिमंडळाच्या विविध समित्यांवरील भाजपा आमदार राजीनामे देतील असे जाहिर केले. नेमके त्याच दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी संजय राठोड गेले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला.

मात्र राजीनामा घेवूनही चार दिवस झाले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे का पाठविला नाही? असा सवाल विरोधकांकडून राज्य सरकारला अधिवेशनातच विचारण्यास सुरूवात केल्याने अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविला. त्यानंतर राज्यपालांनीही त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयास कळविले. तसेच राठोड यांच्याकडील राज्य कारभार मुख्यमंत्र्याकडे सोपविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मागील २० दिवसाहून अधिक काळ संजय राठोड यांच्यावरून सुरु झालेल्या राजकिय वादावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणून टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे गांधी भवनात जावून निदर्शने

ये ‘गुंगी गुडिया नही ये ‘आंधी’ है… हर्षवर्धन सपकाळ हाय हाय… हर्षवर्धन सपकाळ माफी मागा… …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *