शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गत …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? नगरविकास मंत्री शिंदे एकनाथ यांनीच मुंबई केली अनाथ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, बीएमसी झोपले होते का ?
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार, स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य
धारावी हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र आणि वैशिष्टपूर्ण उद्योग समूहाचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पूनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस लिलावाची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा
धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबविल्याप्रकरणी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठकीत झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान, जालना इचलकरंजी महापालिकेला जीएसटी भरपाई मिळणार, महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी, “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार, …
Read More »शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप …
Read More »विधि व न्याय विभागात टंकलेखकांच्या ५ हजार २२३ नवीन पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी
राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार ५ हजार २२३ टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन २ हजार ८६३ नियमित पदे निर्माण करण्यात …
Read More »छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्विकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न
राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …
Read More »
Marathi e-Batmya