मुंबई उपनगरातील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना गोळीबाराच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ …
Read More »आमदार गणपत गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच आज मी गुन्हेगार…
आतापर्यंत शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परंतु शुक्रवारी रात्री उल्हासनगर मधील हिल पोलिस स्थानकात स्थानिक भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला शिंदे गटाच्या शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गणपत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी लहान बंधाऱ्यांना प्राधान्य
राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश देतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. यामुळे महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर उपाययोजना करणे शक्य होईल, असे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात…
पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे …
Read More »आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग घ्यावा
आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसते. मात्र, कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखी कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याचे आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे …
Read More »बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून अर्थसहाय्य प्राप्त
बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे
केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे यासाठी नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत जास्त घरे महाराष्ट्रात झाली पाहिजेत. यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य …
Read More »हिंदूत्ववादी राजकारणात भिजलेल्या राज्य सरकारची जनता जानेवारीतच तहानली
मागील काही महिन्यांपासून राज्यातील हिंदूत्वावादी राजकारणाला आणि हिंदूत्ववादी राजकारणाच्या नावाखाली देवळांच्या सुशोभिकरणासह, पर्यटन क्षेत्रे निर्माण करणे आणि आधीच तहानलेल्या जनतेच्या तोंडात पाण्याचा थेंब टाकण्याऐवजी देवळांच्या स्वच्छतेसाठी लाखो लीटर पाणी वाया घालविण्याचा नवा फंडा सध्या राज्य सरकार दरबारी सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीर हिंदूत्ववादी राजकारणाच्या अखंड डोहात बुडालेल्या आणि भिजलेल्या जनतेला …
Read More »महाराष्ट्रात निप्पॉन स्टील सोबत ४० हजार कोटींचा सामंजस्य करार
औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष …
Read More »राज्य सरकारकडून हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार
हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »
Marathi e-Batmya