मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत भोंगे हटवले असून, ही संपूर्ण कारवाई कोणताही तणाव निर्माण न होता शांततेत पार पडली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अखेर …
Read More »रोहित पवार विधानसभेत म्हणाले, अजित पवार यांनी, अपनों को किया पराया निधी वाटपावरून लगावला टोला
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती …
Read More »मंत्रीच आमदाराला मंत्री म्हणून संबोधतो तेव्हा…. सॉरी म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागितली माफी
विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसाकडे केली आमदार सुनिल शेळके यांची तक्रार रॉयल्टी बुडवल्याचा केला आरोप, पत्र पाठवत केली मोठा आरोप
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, बीडमधील लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची तात्काळ कारवाई
बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …
Read More »अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी सादर केल्या ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कुंभमेळा, रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, मागास घटक विकासासाठी मागण्या सादर
विधिमंडळाच्या जून २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी …
Read More »अजित पवार यांची माहिती, कुंडमळा पूल दुर्घटना दुर्दैवी; मदत व बचावकार्याला सुरुवात दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने …
Read More »पुण्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला, दोघांचा मृत्यू काही लोक वाहून गेले, मृत्यू पावलेल्यांना पाच लाखांची मदत
मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेली पावसाची संततधार आजही कायम रविवारीही कायम होती. रविवारच्या या दुपारच्या मुसळधार पावसात पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल अर्थात कुंडमळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूल कोसळून इंद्रायणी नदीत पडला आणि …
Read More »अजित पवार यांची माहिती, महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात थाटात साजरा...
महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले. अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …
Read More »
Marathi e-Batmya