Tag Archives: mahayuti government

आदित्य ठाकरे यांची टीका, वायुदलाचे विमान उडवून केवळ वायुदलाचा वेळ… महाराष्ट्रात हरतायेत म्हणून महामंडळ आणि विविध निर्णय

‘बेकायदेशीर सीएम शिंदे आणि राजवटीने आज भारतीय हवाई दलाचे सी-२९५ विमान नवी मुंबई विमानतळावर उतरवले. हे विमान कच्च्या आणि लहान धावपट्टीवरदेखील उतरू शकते. विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. अजूनही विमानतळ पूर्णपणे तयार नाही . ही स्टंटबाजी थांबलीच पाहिजे, कारण यामुळे भारतीय हवाई दलाचा वेळ आणि करदात्यांच्या पैशाचा खर्च होत आहे. हवाई …

Read More »

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण; कल्याणकारी उपक्रमांना चालना सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा …

Read More »

भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, जाता जाता महाभ्रष्ट युती सरकारची महाउधळपट्टी सरकारच्या डिजिटल जाहिरातीसाठी ९० कोटी तर SMS साठी २४ कोटींचे टेंडर

भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे ९० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज शिवस्वराज्य यात्रा आता कोकणात

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्ग …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर योजना… महाराष्ट्राच्या दौऱ्यात पहिल्यांदाज महाविकास आघाडीच्या भीतीचा उल्लेख

महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कामे केली आहेत. तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध विकासकामे करण्यात येत असून आज त्याच विकास कामाचा भाग म्हणून मुंबईच्या मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीवाल्यांना जनतेला देण्यात येत असलेल्या योजना पसंत नाहीत. त्यामुळे ते योजना बंद करण्यासाठी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुतीकडून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न ओबीसी - मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी

ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचा आरोपही एक्सवर ट्विट करत यावेळी केला. ॲड. प्रकाश …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका, पंधराशे रु. पेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं संरक्षण देणं गरजेचं ज्यांना सत्तेचा माज...त्यांना खड्यासारखं बाजूला काढायचं

हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय… इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना २०-२० वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, निवडणूकीचा कालावधी येईपर्यंत आपली बहिण आठवत नव्हती… हे सरकार गेल्यात जमा , वेळ पडली तर तर आंदोलनकर्त्यांबरोबर आंदोलन करतील

कोकणातील दौऱ्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात …

Read More »