Tag Archives: minister

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवार जाहिर भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, जणगणनेचा अधिकार केंद्र सरकारलाच

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …

Read More »

दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार अनेकवेळा गंमतीने बोलत असतात… तर शंभराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माग घेतील अनं समजही देतील

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन लक्ष्य केले. तसेच महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला …

Read More »

साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ९ जानेवारी २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांची मागणी, शेतमजूरांची, ट्रॅक्टर वाहतूकदार शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांवर कारवाईसाठी यंत्रणा- सरकारकडून घोषणा

राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत. उसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजूरांचे, ट्रॅक्टर खरेदी करुन ऊसवाहतूक व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे बुडवतात. यामुळे शेतमजूरांवर उपासमारीची, शेतकऱ्यांच्या मुलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उलटपक्षी …

Read More »

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना तीन महिन्यात वाढीव विद्यावेतन देणार पाचशे रूपये विद्यावेतन देणार असल्याची मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर …

Read More »

अजित पवार यांनी काढला अब्दुल सत्तारांचा जमिन घोटाळा, हकालपट्टीच्या मागणीवरून गोंधळ विरोधक आक्रमकः सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब

सर्वोच्च न्यायालयाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत मंत्री पदाचा दुरुपयोग केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी …

Read More »

अजित पवारांचा टोला, सोयीचे आहे ते चालतंय बाकीचं आमच्यावर द्या ढकलून, वाह रे पठ्ठे अब्दुल सत्तार प्रकरणी भाजपाला अजित पवारांचा टोला

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारमधील विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी नियमबाह्य पध्दतीने गायरान जमिनचे वाटप केले. त्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत सत्तार यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन …

Read More »

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती

नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …

Read More »

कोरोना कालावधितील विधवा आणि अनाथ मुलांच्या मानधनात वाढ मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात कोरोना कालावधित विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याला विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचा समावेश

दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. मात्र या स्मारकात सर्वाधिक उंच पुतळा असावा ही जनतेची मागणी नव्हे तर काँग्रेसची आहे. तसेच स्मारकातील पुतळ्याला आपला विरोध असून  स्मारकात पुतळ्याऐवजी आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारे ऑक्सफर्ड आणि बॉन सारख वैचारीकतेची देवाण-घेवाण करणारी संस्था असावी असे भूमिका वंचित …

Read More »