Tag Archives: MSP

शासन दरापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही

तूर खरेदी साठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणा-यांवर कारवाई केल्या जाईल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. हंगाम …

Read More »

वाढवण बंदर रद्द, पेसा भरती, शेतमालाला हमी भाव प्रकरणी कॉ विनोद निकोले यांचे आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यावर केले आंदोलन

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असता पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२८ डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी वाढवण बंदर, पेसा भरती आणि शेतमालाला हमी भाव या प्रश्नी विधानभवनात फलक झळकवत जिल्ह्यातील विविध मागण्यांप्रश्नी आंदोलन केले. यावेळी आमदार निकोले यांनी आमची एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द, …

Read More »

या खरीप पिकांना मिळणाऱ्या किमान हमी भावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य किंमत मिळावी यासाठी विपणन हंगाम २०२४-२५ करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत, कारळे (₹९८३ प्रति क्विंटल), तीळ (₹६३२ प्रति क्विंटल), आणि तूर/अरहर (₹५५० प्रति क्विंटल) …

Read More »

केंद्र सरकारकडून १४ पिकांना एमएसपी जाहिर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी धान, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस या १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की मंत्रिमंडळाने १४ पिकांच्या खर्चाच्या तुलनेत किमान ५०% अधिक एमएसपी MSP मंजूर केला आहे. “आजच्या मंत्रिमंडळात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या …

Read More »

मंत्री पियुष गोयल म्हणाले; मका डाळी कापसासाठी आधारभूत किंमत देण्यास तयार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

मागील काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतमालाला कायदेशीर हमी भाव द्या या मागणीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबरोबरील सततच्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी मका, डाळी आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याची तयारी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी दर्शविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पियुष गोयल हे आज बोलत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी !

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही …

Read More »

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले; शंभू व खंजौरी बॉर्डरवर लाठीचार्ज, तर केंद्राकडून चर्चेचा प्रस्ताव

देशातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादीत मालाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी शंभू बॉर्डर आणि खंजुरी बॉर्डरवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नुकतेच मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी …

Read More »

केंद्र सरकारचा एमएसपीला नकार, दिल्लीच्या सर्व सीमांवर १४४ लागू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत कायदेशीरदृष्ट्या लागू करावी या मागणीवरून पंजाब, हरियाणा राज्याबरोबर देशाच्या इतर भागातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचले. काल १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटेपासून दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची दिल्लीत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमले. परंतु शेतकऱ्यांना काहीही करून शंभू …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

शेतकरी- पोलिसांमधील धुमचक्रीमुळे टिकरी बॉर्डर बंद, अडेलतट्टू भूमिका घेतल्यास..

देशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने शेतमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा चल्लो दिल्लीची घोषणा देत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभरात पंजाब, हरियाणातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंघू अर्थात शंभू सीमावर्ती भागात पोहोचले. पण आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप उडाल्याने अखेर दिल्लीच्या दिशेने असलेली टीकरी बॉर्डरवरील सुरक्षा आणखी …

Read More »