रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील सरासरी घरांच्या किमती गेल्या पाच वर्षांत घरांची मागणी वाढल्याने किंमतीत जवळपास ५०% वाढ झाली आहे. अॅनारॉक Anarock च्या अहवालात असे दिसून आले आहे की दिल्ली-NCR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत जानेवारी-जून २०२४ मध्ये ४९% वाढून ६,८०० रुपये प्रति …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा महायुतीने भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली
राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज करत अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहे. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …
Read More »मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने येणा-या प्रश्नासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती निर्णय घेणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती
मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. शासनाकडे आलेल्या सगेसोयरेच्या हरकतीबाबत सरकारचा निर्णय झाला का, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना शपथपत्र देवून त्यांना प्रमाणपत्र द्यावे, …
Read More »मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …
Read More »धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती… ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार
केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध …
Read More »राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवे, प्रसाद लाड विधान परिषदेत भिडले सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून विधान परिषदेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी, त्यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा नव्हे तर तीनदा तहकूब करण्याची पाळी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आली. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरळीत सुरू असताना, दुपारी चारच्या सुमारास भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले
स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पुढील तीन महिन्यांत निर्णय विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले उत्तर
राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »मुंबईतील घरांची मागणी कमी असूनही किंमती चढ्या दरानेच नाईट फ्रॅकच्या अहवालातील माहिती
मुंबईत मागील काही वर्षात घरांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मात्र यातील अनेक घरे ही एक तर ती मध्यम आकाराची किंवा मोठ्या आकाराची असतात. तरीही या घरांच्या किंमती पाह्यल्या तर त्या जास्तच असल्याचे दिसून आले आहे. बरं या घरांच्या किंमती चढ्या जरी असल्या तरी घरांची मागणी कमी होत …
Read More »उदय सामंत यांची माहिती, दावोसच्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार तीन वर्षात केलेल्या सामंज्यस करारावर श्वेत पत्रिका काढणार
थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत …
Read More »
Marathi e-Batmya