मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अवैध पध्दतीने निलंबित सहाय्यक पोलिस इन्सपेक्टर असलेल्या सचिन वाझे याच्याकडून कोट्यावधी रूपये गोळा करण्याचे आदेश दिले. याप्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची नावे वाझे याने घेतलेली असल्याने या …
Read More »राज्यपालांच्या पत्राला राष्ट्रवादीचे उत्तर …आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू - मलिक
मुंबई: प्रतिनिधी आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. परंतु आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या …
Read More »मंत्रालयातील प्रवेशासाठी आता असे राहणार सुधारीत नियम: सर्वांसाठी लवकरच खुले राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयात आमदार, खासदार यांच्यापासून ते सर्वसामान्य व्यक्तींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र आता तब्बल दिड वर्षानंतर सर्वसामान्य नागरीकांपासून ते सर्वच शासकिय अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरीकांसह इतरांच्या वाहनांनाही …
Read More »अनिल देशमुख यांनी ईडीला लिहीलेल्या पत्रात कोणत्या मागण्या केल्या ७२ वर्षाचे असल्याने अनेक व्याधींनी ग्रस्त
मुंबई: प्रतिनिधी सीबीआयबरोबरच आता ईडीनेही माजी चौकशी सुरु केली असून मंत्री असताना राहीलेले खाजगी सचिव पलांडे आणि शिंदे या दोघांना ईडीने चौकशीनंतर अटक केल्यानंतर चौकशीसाठी ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांना समन्स पाठविले. मात्र आपले ७२ वय असून प्रत्येकवेळी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात येता येणार नाही. त्यामुळे आपण माझी ऑडिओ किंवा व्हिडिओ …
Read More »अखेर राष्ट्रवादीचा परिवार संवाद दौरा रद्द हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती
हिंगोली: प्रतिनिधी राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवित असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा दुसरा टप्पा मराठवाड्यातील तुळजापूर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आली. त्यात यवतमाळ …
Read More »सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र
नांदेड: प्रतिनिधी सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो …
Read More »#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …
Read More »खडसेंचा भाजपाला खोचक सल्ला “त्या” नेत्याचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा ओबीसी आरक्षणप्रश्नी आक्रमक झालेल्या भाजपावर रोहिणी खडसेंचे टीकास्त्र
मुक्ताईनगर-मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनालाच जोडूनच भाजपामधल्या “त्या” ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा असाल खोचक सल्ला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला ट्विटरवरून दिला. भाजपामधील ओबीसी …
Read More »ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले… देशमुख यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी आज सकाळपासून ईडीने मुंबई आणि नागपूरातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. या दरम्यानच्या काळात आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले असून ईडी आणि सीबीआयला असेच सहकार्य करू अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे …
Read More »राज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …
Read More »
Marathi e-Batmya