मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना …
Read More »महा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर …
Read More »हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला
मुंबई: प्रतिनिधी २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट असल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारला लगावला. ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी …
Read More »कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून पुढे जाऊ मात्र आरक्षणप्रश्नी भाजपा दुतोंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी कुठल्या पध्दतीने ओबीसी आरक्षण देता येईल याबाबतीत कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करुन पुढे जाऊ. मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाकडून नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान या राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकमेकांशी सहजरीत्या भेटणे इतके सोपे नाही. मात्र भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या …
Read More »कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा नवा नारा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात आलेली दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचे सारे श्रेय तुम्हा जनतेचे आहे. तिसरी लाट कधी येईल कोणत्या तारखेला येईल याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचं असल्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. तसेच प्रत्येक गावच्या संरपंचाने …
Read More »BreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार
मुंबई : प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी …
Read More »सोशल मिडियाला संपवणं आणि लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा खेळ लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहणाचा भाजपाचा कुटील डाव- नवाब मलिक
मुंबई्: प्रतिनिधी व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. केंद्र सरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणं हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम दिल्लीत मराठा गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …
Read More »जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले हे अधिकार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास …
Read More »
Marathi e-Batmya