Tag Archives: ncp

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

फडणवीस अभिभाषणावर बोलताय की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला

नागपूरः प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत होते तेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले की श्रद्वेय बाळासाहेबांप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला ? …

Read More »

सरकार स्थापनेवरून रंगली फडणवीस आणि शिंदे यांच्यात खडाजंगी अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेत्यांची घसरली गाडी

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत हे सरकार जनमताचा कौल नाकरून सत्तेत विराजमान झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गोवा, मेघालय येथे काय केले ते आठवून पहा …

Read More »

शेतकरी आणि पुरग्रस्तांसाठी केंद्राकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी अर्थमंत्री जयंत पाटील यांची सभागृहात माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती अर्थ मंत्री जयंत …

Read More »

एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका

नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …

Read More »

शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे स्वागत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट दिली. परंतु त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आली त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखीत केले. या घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रू.ची रक्कम डिपॉझिट ठेवणार आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मान जगता यावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० …

Read More »

जून्यांचे अनेक कर्मचारी-अधिकारी नव्या मंत्र्यांच्या प्रतिक्षेत २०० हून अधिकजण आजारपणाच्या सुट्टीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मंत्र्याकडे आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायांना नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जून्या मंत्र्यांच्या कडच्या अनुभवाचा फायदा नव्या मंत्र्याकडे करून घेण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात रूजू होण्याऐवजी आजारपणाच्या सुट्टीवर जाणे पसंत केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्र्यांकडे विशेष …

Read More »

देशात भाजपा विभाजनकारी मानसिकता आणतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. आज संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रवादीची ८० लाख रूपयांची मदत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी होणार मदतीचे वाटप करणार

मुंबईः प्रतिनिधी मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हेक्टरी ८ आणि १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. …

Read More »