नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षकांकडून जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून विधान परिषद आणि विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून्या पेन्शन योजनेबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत ही योजना लागू …
Read More »संजय राऊत म्हणाले, पिंपरीची जागा शिवसेना तर कसबा पेठेचा निर्णय दोन्ही काँग्रेस घेतील पुण्यातील पोट निवडणूकीबाबत संजय राऊत यांची माहिती
कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादीकडून लढविण्याची तयारी सुरु असताना पिंपरी-चिंचवडची जागा शिवसेना लढविणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. …
Read More »फडणवीसांच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, अशी चर्चा झालीच नाही उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही जे बोलतो ते किती स्पष्ट बोलतो
आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरुंगात टाकण्याची सुपारी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपातील …
Read More »अजित पवार यांचा सवाल, शिवसेना – वंचित युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडू...
शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या …
Read More »माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस …
Read More »उध्दव ठाकरे यांची तैलचित्रावरून टीका, चांगली गोष्ट, मात्र तुमचा हेतू वाईट पवारांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग आम्ही काय करत होतो?
आगामी मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना पक्षमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र बसविण्यात आले. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »जयंत पाटील म्हणाले, राज्यपाल आम्हालाच सांगत होते ‘मुझे जाने का है’ आता त्यांच्या विनंतीचा विचार करा
राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है… आता लेखी विनंती केली आहे तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त …
Read More »राज्यपालांबाबतचे अजित पवारांचे ते वक्तव्य अखेर खरे ठरले… अमित शाह आणि नरेंद्र मोदी मला पदमुक्त करत नाहीत
काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डि.लीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी …
Read More »आंबेडकर-ठाकरे युतीवर शरद पवारांचे मोठे विधान सोमवारी वंचित आणि शिवसेना युतीची अधिकृत घोषणा
एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास …
Read More »वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नाही ठाकरे गटाशी आमची बोलणी सुरु आहे त्याबाबत उध्दव ठाकरे घोषणा करतील
स्व.प्रबोधनकारक ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घालत युतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वंचित आणि …
Read More »
Marathi e-Batmya