जयंत पाटील म्हणाले, राज्यपाल आम्हालाच सांगत होते ‘मुझे जाने का है’ आता त्यांच्या विनंतीचा विचार करा

राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है… आता लेखी विनंती केली आहे तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.

केंद्र सरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *