‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »मत चोरीच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सासाराम येथून मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, १६ दिवस चालणार यात्रा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १,३०० किलोमीटर अंतर कापेल आणि १ सप्टेंबर रोजी पटना येथे एका मोठ्या रॅलीने संपेल, जिथे विविध भारतीय पक्षांचे नेते सहभागी होतील. एक्स वरील पोस्टमध्ये …
Read More »सीईसी ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींच्या आरोपावर राजकीय उत्तर, चुकीची माहिती समाधानकारक उत्तर न देताच आरोपकर्त्ये राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न
साधारणतःवर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणूकीत कर्नाटकात लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप केला. त्यासाठी मतदार यादीतील चुकीची नावे, एकाच पत्यावर अनेक मतदारांची नाव नोंदणी आदी अनेक गोष्टींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. तसेच बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून …
Read More »निवडणूक आयोग म्हणतो, समस्या आधी सांगितल्या असत्या तर त्या ईआरओकडून…. प्रत्येक टप्प्यावर राजकिय पक्षांचा सहभाग
मागील निवडणुकांमधील मतदार यादीतील कथित त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या राजकीय पक्ष आणि व्यक्तींवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) शनिवारी टीका केली आणि म्हटले की नियुक्त दावे आणि हरकती कालावधी नेमके याच उद्देशाने अस्तित्वात आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आणि म्हटले की ही एक पारदर्शक, बहु-टप्प्याची प्रक्रिया …
Read More »पुणे न्यायालयात राहुल गांधी यांची माहिती, सावरकर यांच्या वंशजांकडून जीवाला धोका स्वा.सावरकर अवमान याचिका प्रकरणी सुनावणीवेळी दिली माहिती
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुणे न्यायालयात सांगितले की, अलिकडच्या राजकीय संघर्षांमुळे आणि त्यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात तक्रारदार आणि सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांच्या मुळे जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाला विनंती केली की, त्यांनी …
Read More »मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रोखला, राहुल गांधी यांना अटक मोर्चेकरी स्थानबद्ध
सोमवारी राष्ट्रीय राजधानीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या इंडिया आघाडीच्या सुमारे ३०० विरोधी खासदारांनी ‘मत चोरी’च्या आरोपावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली आणि निवडणूक आयोगावर भाजपाशी संगनमत करून त्यांच्या निवडणूक उद्दिष्टांना साध्य करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पोलिसांनी मध्यभागी रोखला, ज्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव …
Read More »कर्नाटक निवडणूक आयोगाचे राहुल गांधी यांना पत्र, कागदपत्रे सादर करा आरोपाची समर्थन करणारी कागदपत्रे पाठवा
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदाराने दोनदा मतदान केल्याच्या त्यांच्या आरोपाचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. पत्रात, निवडणूक आयोगाच्या सीईओने राहुल गांधी यांच्या अलीकडील पत्रकार परिषदेचा उल्लेख केला आहे, जिथे त्यांनी त्यांच्या सादरीकरणातील काही कागदपत्रे “ईसी …
Read More »निवडणूक हेराफेरीवर वंचित बहुजन आघाडीकडून शरद पवार यांना सवाल हेराफेरीची माहिती असूनही पोलिसात तक्रार का केली नाही
वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणावरून थेट निशाणा साधला आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स ‘X’ हँडलवरून शरद पवार यांना पाच थेट प्रश्न विचारले असून, या घडामोडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे. वंचित बहुजन आघाडीने विचारलेल्या मुद्द्यांनुसार, शरद पवार यांना दोन व्यक्तींनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …
Read More »शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?
नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …
Read More »
Marathi e-Batmya