Tag Archives: revenue minister

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात २०० ‘खासगी भूमापकांची’ नियुक्ती अल्पभूधारकांसाठी मोजणी शुल्कात सवलतीचे संकेत

राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता शासकीय मोजणी कामी ‘खासगी परवानाधारक भूमापकांची’ नियुक्ती करण्यात आली असून, ३० मार्च २०२६ पासून हे भूमापक प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात उभय सभागृहात …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बिनशेती झालेल्या मिळकतींवर अकृषिक कर रद्द विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतींवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय १० फेब्रुवारी २०२६ च्या सुधारित निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. तथापि, २००१ पूर्वी झालेल्या रुपांतरणासाठी तेव्हाच्या रेडी रेकनरनुसार एकरकमी रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंमलबजावणीचा आढावा

राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती

पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …

Read More »

अंजली दमानिया यांनी कागदपत्रे दाखवत जमिन घोटाळ्याचा पार्थ पवार यांच्यावर केला आरोप अजित पवार यांच्या राजीनाम्याची केली मागणी

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्यावर करण्यात येत असलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्या नावे झालेल्या मोठ्या जमिन व्यवहारात व्यवहाराचं मूल्य स्टॅम्प ड्युटी चुकविण्यासाठी कमी दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दाखविल्यानंतर त्यावर राजकिय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु झाले. दरम्यान …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द राज्यातील ४९ लाख तुकड्यांचे व्यवहार होणार नियमित

राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर अनुज्ञेय क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे आणि प्लॉट कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल ·योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्र्यांचे कौतुक

महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला चालना ११,०१५ चौ.मी. जमीन पुणे महापालिकेला प्रदान

पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूल व वन विभागाने पुणे महानगरपालिकेला ११,०१५ चौरस मीटर (१ हेक्टर १०.१५ आर) इतकी शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला नवे बळ मिळणार असून, मुळा-मुठा नदीच्या विकासाचा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देणार महसूल सेवकांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न

महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना' महत्त्वाची

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन कार्यवाही करत असून दिवाळीपूर्वी लाभ देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी व ग्रामीण भागासाठी ‘बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ महत्त्वाची आहे. यातील पाणंद रस्ते कामांना गती मिळावी यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीला अधिकार देण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »