Tag Archives: solapur

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे …

Read More »

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि  पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली …

Read More »

सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा ऑगस्ट मधील नुकसानाची मदत मंजूर, सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच देण्यात येईल

सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. …

Read More »

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी …

Read More »

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन जारी जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात  असल्याने नागरिकांनी …

Read More »

सोलापूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला स्वतःची जागाच मिळेना २०२० पासून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाहण्यासाठी वेळच नाही

राज्यातील गुन्ह्यांचा तपास अतिजलद पद्धतीने करता यावा यासाठी राज्य सरकारने जवळपास विभागातीय आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर न्याय वैद्यक प्रयोगशाळा उभारण्याचे धोरण तयार केले. त्याअंतर्गत न्यायवैद्यक प्रयोगशाळा तयार करण्याचे धोरणही तयार केले. त्यानुसार सोलापूरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना राज्य सरकारनेही केली. मात्र या भाड्याच्या जागेत असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकरीता स्वतःची जागा असावी याकरिता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल-मुख्यमंत्री

सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात मृतांना आर्थिक मदत जाहिर कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी जाहिर केली मदत

सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. ही दुर्घटना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सोलापूरातील टॉवेल कारखान्याला लागलेली आग दहा तासानंतर आटोक्यातः आठ कामगारांचा मृत्यू संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आग आली आटोक्यात

सोलापूरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्याला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या आगीच्या दुर्घटनेत एक महिला कामगाराचा समावेश असून एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. दुर्घटनेत कारखाना मालकाचे कुटुंबियासह आणि काही कामगार …

Read More »

सोलापूरात दूषित पाण्याचा परिणामः दोन मुलींचा मृत्यू तर तिसरी मुलगी गंभीर दुषित पाण्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात

मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर महापालिका आणि राज्यकर्त्ये हे अपयश ठरले. त्यातच सोलापूर महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अनेक वार्ड ऑफिसर्सना तक्रारी करण्यात आल्या. तर काही स्थानिक …

Read More »