विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील …
Read More »कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत
जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, उद्योग कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री गुजरातमध्ये गेले का? सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का ?
शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच मोदी-शाह यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुनगंटीवार, सामंत यांचा गुजरात दौरा गुजरातच्या सि.एम. डॅशबोर्ड चा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अहमदाबाद दौरा
राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार प्रत्यक्ष कोण चालवतो यावरून सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवित असल्याचा आरोपही करण्यात येतात. आता या आरोपांना पुष्टी देणारी एक घटना नुकतीच पुढे आली आहे. राज्याचे वनमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी …
Read More »रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ? राज्य सरकारकडून अधिकृत माहिती नाही पण प्रवास महागणार रिक्षा, टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्र्याची सकारात्मक चर्चा
रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी …
Read More »‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी सामंजस्य करार
मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. ‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल, …
Read More »नारायण राणे म्हणाले, व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी
महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलेले आहे. वैद्यकीय उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की …
Read More »आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या आतली बातमी उदय सामंत समर्थकांकडून बाहेर आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा ! खुर्च्या एक हजार गप्पा दहा हजाराच्या..!
उद्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीत येत आहेत. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या समर्थकांकडून एक बातमीवजा आतली माहिती व्हायरल करण्यात येत आहे. सदरची बातमी खालील प्रमाणे… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर चर्चा व नियोजन करण्यासाठी रत्नागिरीत एक बैठक नुकतीच पार पडली. सुरूवातीला या दौऱ्याचा खर्च कोणी करायचा …
Read More »उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना सवाल, मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? नाणार रिफायनरीची ३.५ लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या!
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे. …
Read More »रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल विभागाचे दोन अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार झाले नियुक्त
रत्नागिरी जिल्ह्यामधील महसूल विभागातील दोन अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणचे तहसिलदार जयराम सुर्यवंशी यांची ओएसडी म्हणून नियुक्ती करून घेतली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ओएसडी म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांना तर शालेय …
Read More »
Marathi e-Batmya