१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास २,२१५.१३ कोटी रूपयांची निधी राज्य सरकारने मंजूर केला.
विदर्भाबरोबरच मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भातील अमरावतीत सर्वाधिक १ लाखाहून अधिक शेतकरी बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर मराठवाड्यातील नांदेडमधील ७ लाख ८१ हजार ८११ सर्वाधित शेतकरी बाधित झाले. त्यानंतर धाराशिव मध्ये सर्वाधिक २ लाख ३५ हजार शेतकरी बाधित झाले. हिंगोलीत ३ लाख ८ हजार शेतकरी बाधित झाले आहे. त्याचबरोबर परभणीत २ लाख ३८ हजार, बीडमध्ये १ लाख लाख १४ हजार, बुलढाण्यात २ लाख ७९ हजार शेतकरी बाधित, यवतमाळ मध्येही २ लाख २६ हजार शेतकरी बांधित झाले. लातूरमध्ये ३ लाख ८ हजार शेतकरी आणि वाशिममध्ये २ लाख १२० हजार शेतकरी बाधित झाल्याची नोंद सरकार दरबारी झाली आहे.
तसेच २६ सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात भिंत कोसळून, वीज कोसळून झालेल्या घटनांमध्ये ३४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ८४ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय बाधित शेतकरी संख्या आणि मंजूर करण्यात आलेला मदत निधी
छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची संख्या-१७१- निधी ०.१६ अकोला मध्ये १९१७४ शेतकरी बांधित- निधी-१२.२७, अमरावती १ लाख ७० हजार७७३, तर निधी, १११.४७ , अहमदनगर १४० जण बाधित, ०६, कोल्हापूरात बाधित शेतकरी ३७ हजार ४३१ बाधित. निधी १४.८९, गडचिरोली १८ हजार ०३ शेतकरी बाधित, निधी १२.९०, गोंदिया बाधित शेतकरी २५६, निधी ०.२३, चंद्रपूर बाधित शेतकरी १३७४२ निधी-७.३३, जळगांव बाधित शेतकरी १७३३२ निधी ९.८६, धाराशिव बाधित शेतकरी निधी २ लाख ३५ हजार २२१, निधी १८९.८३, धुळे बाधित शेतकरी ७२, निधी-०१, नंदूरबार बाधित शेतकरी २५, निधी-०.१, नांदेड बाधित शेतकरी ७ लाख ८१ हजार ८११, निधी-५६४.२५, नागपूर बाधित शेतकरी ९ हजार २९ शेतकरी निधी ३.९३, नाशिक मधील बाधित शेतकरी ७ हजार १०८,निधी ३.८२ , परभणी बाधित शेतकरी २ लाख ३८ हजार ५३०, निधी १२८.५५, बीड मधील बाधित शेतकरी १ लाख १४ हजार निधी ५६.७६, बुलढाणा बाधित शेतकरी २ लाख ७९ हजार १४८, निधी २०४.१५, भंडारा बाधित शेतकरी ८२८३, निधी ४.३३, यवतमाळ बाधित शेतकरी २ लाख २६ हजार ८३८, निधी १८३.६८, रत्नागिरीतील बाधित शेतकरी ५६०, निधी-०.१३, रायगड बाधित शेतकरी ९८०, निधी ०.१२, लातूर बाधित शेतकरी ३ लाख ८० हजार ५११, निधी २४४.३५, वर्धा बाधित शेतकरी १२ हजार ७५५, निधी-७.७३, वाशिम बाधित शेतकरी २ लाख १० हजार ९२०, निधी-१५०.७९, सांगली बाधित शेतकरी १३ हजार ६३२, निधी-७.५२, सातारा बाधित शेतकरी १४२, निधी-०.०३, सिंधुदूर्ग बाधित शेतकरी ३३५, निधी-०.१३, हिंगोली बाधित शेतकरी ३ लाख०८ हजार ४७१, निधी-२३५.०७, सोलापूर बाधित शेतकरी ५९ हजार ११०, निधी-५९.७९
Marathi e-Batmya