Breaking News

पुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी

आगामी तीन दिवस मुंबईसह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वक्त केली. तसेच या कालावधित नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.

वास्तविक पाहता वेधशाळेने हा इशारा १२ ऑक्टोंबरपासून दिला. त्यानुसार मागील दोन दिवसात मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने येथील शेती पिकाचे नुकसान होवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी हाताशी आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. आता १४, १५ आणि १६ ऑक्टोंबर हे तीन दिवस आणखी पाऊस पडणार आहे.

Check Also

३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती

भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *