कामगार मंत्री वळसे-पाटील झाले मुक्त सोलापूरची जबाबदारी आता गृहनिर्माण मंत्री आव्हाडांकडे

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र या धामधुमितही कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा पदभार काढून तो गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच यासंदर्भात शासन आदेशही तातडीने जारी करण्यात आला.

कामगार मंत्री दिलीप वळसे –पाटील हे अभ्यासू आणि जबाबदार राजकिय नेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्याच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यातच कोरोना आजारामुळे राज्यातील असंघटीत कामगार, बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे बनल्याने त्यांच्याकडील सोलापूरचे पालकमंत्री पद काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *