मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी

मुंबई: प्रतिनिधी
मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार आहे.
ज्या मजुरांना त्यांच्या मायदेशी परत जायचे आहे त्यांच्या वाहतुकीसाठी आडमुठेपणाचे धोरण ठेवणार नसल्याचे शिवाय राज्य परिवहन बसेस मजुर व प्रवासी यांच्या प्रवासासाठी वापरल्या जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
याशिवाय केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही त्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याच्या व्यवस्थेचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रवासी आणि मजुरांच्या या प्रश्नात लक्ष घालून त्यांना स्वीकारण्यास भाग पाडावे अशी विनंतीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *