मंत्रालयातील १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना नेमले पोलिसांच्या मदतीला ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महानगर, पुणे महानगरातून स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या मजूरांच्या पाठविणीसाठी पोलिस यंत्रणेकडे आणि राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामगारांना पाठविण्याच्या कामात अडचणी येत होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने अखेर मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील १४२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
नुकतेच वादग्रस्त आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील स्थलांतरीत मजूरांना गावी पाठविण्याच्या कामासाठी समितीची स्थापना केली. त्यानंतर राज्य सरकारकडून सर्व विभागातील ४० वर्षाच्या वयोगटातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माहिती जमा होताच १४२१ जणांची यादी करून त्यांना पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या सर्वांची सेवा पुढील आदेश होईपर्यत मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पडझड झालेले जैश ए मोहम्मदचे मुख्यालय पुन्हा सुस्थितीत नवीन संगमरवर. नवीन रंगरंगोटी आणि प्लास्टरने पुर्नबांधणी

एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या काही दृश्यांनुसार, पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) मरकज सुभान अल्लाह मुख्यालयाचे पुनर्रचना पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *