विधान भवनातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा शिवसेनेची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या विधान भवनाच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे मोठे पुतळे आहेत. मात्र या पुतळ्यांच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची फारच कमी असल्याने या विधान भवन परिसरातही शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा संसदेतही भव्य पुतळा आहे. त्याच धर्तीवर विधान भवन परिसरातही अशा स्वरूपाचा पुतळा उभारावा अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अनन्यसाधारण आहे. देशाला भूषणावह असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून अशा पूजनीय आराध्य दैवताचे संसदेच्या प्रांगणातही भव्य शिल्प आहे. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच पुतळा निर्माण करून सध्या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागी त्याची पुनर्स्थापना करावी अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *