रामदास आठवले म्हणाले, विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आज दुपारी १२ वाजता रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, ऐतिहासिक विजय स्तंभ स्मारकासाठी समाज कल्याण विभाग आणि प्रशासनाने आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक शंभर एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा. एकदा भूसंपादन निर्णय राज्य सरकार ने घेतला की लगेच विजयस्तंभपरिसरातील अतिक्रमण निर्मूलन करता येईल.स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित होतील त्यांना योग्य मोबदला देऊन योग्य पुनर्वसन करावे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्रालयातर्फे काही निधी मिळेल का याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; परशुराम वाडेकर; पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे; माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे; पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण; बाळासाहेब जानराव; संजय सोनवने; नगरसेविका हिमालीताई कांबळे; शशिकलाताई वाघमारे ; डॉ विजय मोरे; सुमित वजाळे; उमेश कांबळे आदी अनेक मान्यवर तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

शुभमन गिल

भारत-दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, ऋषभ पंत कर्णधार

भारताचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *