मिताली मयेकर’ला नेटकऱ्यांचा प्रश्न ‘बोल्ड फोटो शेअर केल्यावर…’ नेटकऱ्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नाला मिताली सडेतोड प्रतिउत्तर

मिताली मयेकर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच काहीतरी पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मिताली अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मिताली तिच्या बोल्ड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मितालीच्या बिकनी फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मिताली नुकतीच विदेशात फिरायला गेली. अशात तिने काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर इनस्टाग्रामवर शेअर केलेत. मात्र या फोटोमधील तिचा अंदाज अनेकांना आवडलेले नाही. यावरून आता तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशाच तिच्या एका फोटोवर नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. फोटोवरची कमेंट पाहून मितालीने संबंधित ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे.

सध्या तिचे बाली ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. बालीच्या समुद्रकिनारी बिकिनी घालून कतिने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. या हॉट लुकने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काहींना तिचा हा रुचलेला नाही. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांने कमेंट करत लिहिले की,’नागडं झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?” असा विचित्र प्रश्न विचारल्यावर मितालीने यावर, “माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून” असं सडेतोड उत्तर दिलं आहे.

About Marathi E Batmya

Check Also

Fatima Bosch of Mexico is Miss Universe 2025

मिस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट मेक्सिकोच्या फातिमा बॉशने पटकावला

मिस युनिव्हर्स २०२५ चा ग्रँड फिनाले थायलंडमध्ये संपन्न झाला, जगाचे लक्ष या रोमांचक स्पर्धेवर केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *