ममता बॅनर्जी यांचा आरोप, भाजपा केंद्रीय यंत्रणाकडून धमक्या…

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालबरोबरच देशातील इतर राज्यांमधील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए आणि सीबीआयकडून धाडसत्र सुरु आहे. तसेच धाडीनंतर सदर नेत्याला या केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून भाजपासोबत जा नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार रहा अशा धमक्या देण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एका प्रचार रॅलीला संबोधित करताना आरोप केला की, केंद्रीय तपास यंत्रणा टीएमसी नेत्यांना भाजपामध्ये सामील होण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्यास सांगत असल्याचा गौप्यस्फोट केला.

पुरुलियातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयटी विभाग यासारख्या एजन्सी भाजपाचे “हात” म्हणून काम करत आहेत. “TMC नेत्यांना त्रास देण्यासाठी NIA, ED आणि CBI सारख्या एजन्सीचा वापर केला जात आहे. ते पूर्व माहिती न देता छापे टाकत आहेत आणि घरांमध्ये घुसत आहेत. रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना त्यांच्या घरात कोणी घुसले तर महिला काय करतील? असा सवालही यावेळी केला.

ममता बॅनर्जी भूपतीनगरमधील शनिवारच्या घटनेचा संदर्भ देत म्हणाल्या की, जिथे एनआयएच्या एका पथकाने बॉम्बस्फोट प्रकरणात दोन आरोपींना पकडण्यासाठी गेले असताना जमावाने हल्ला केला होता. एजन्सी आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकतर भाजपामध्ये जा किंवा कारवाईला सामोरे जाण्यास सांगत आहेत, असा आरोपही केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केली घोषणा

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *