प्रविण दरेकर यांचा इशारा,… अहंकारच तुमचा वैचारिक ऱ्हास करेल मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर

मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही, असे सणसणीत उपरोधिक टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.

पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, मी भंगार आहे कि अंगार आहे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला नीट माहित आहे. परंतु जरांगे तुमच्यात अहंकार आलाय. तुमच्यावर कुणी प्रश्न विचारायचे नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही. दिल्या कि तुम्ही शिव्या देणार. हे मराठा समाजाला अजिबात आवडत नाही. तुम्ही खुशमस्कऱ्यांच्या धुंदीत आहात. त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना प्रविण दरेकर पुढे म्हणाले कि, आम्ही गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी जे काय करतोय याची जरांगेंना कल्पना नाही. त्याच्या एक टक्के मराठा समाजाच्या मुलांसाठी तुम्ही काय केले असेल तर सांगा. केवळ भावनिक बोलायचे आणि मराठा समाजाला गुमराह करायचे हे काम जरांगेंचे सुरू आहे. ना कधी रचनात्मक काम केलेत आणि कधी करू शकत केवळ वलग्ना करायच्या, सरकारवर कुणाची तरी सुपारी घेऊन बोलायचे यापलीकडे जरांगेंनी मराठा समाजाला काय दिले याचा लेखाजोगा मांडा अन्यथा माझी तयारी आहे आपण काय केले आणि मी काय केले हे लोकांसमोर येईल, असे आव्हानच जरांगे पाटील यांना दिले.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *