राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यापासून अजित पवार हे सातत्याने प्रत्येक जाहिरसभेत बोलताना माणसानं आता कुठेतरी थांबायला हवं, वय झालं पुढीच्या पिढीच्या हातात सगळं सोपवायला पाहिजे असे सांगत अप्रत्यक्ष शरद पवार यांना निवृत्तीचे वय झाल्याची आठवण करून देत असतात. आज साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव संजीवराजे निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, वय ८१ झालं, ८२ झालं पण वय ९० झालं तरी हे म्हातारं थांबणार नाही असे सांगत अजित पवार यांना उत्तर देत राज्याच्या राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली, असा खोचक टोला लगावत सत्ताधाऱ्यांना लगावत पुढे म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली आहे. मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का? असे कार्यकर्ते यांच्याकडून बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या, मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत असे सांगायलाही यावेळी विसरले नाहीत.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवार साहेब यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली आहे. मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का? असे कार्यकर्ते यांच्याकडून बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या, मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात घाबरट होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ झाली त्यामध्ये फलटण अग्रेसर होता. हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले. कारण महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पद मिळावं, याचा काँग्रेस ठराव फलटणमधील मनमोहन पॅलेस येथे झाला. त्यामुळे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये फलटणकरांचे योगदान मोठं हे कुणी विसरू शकत नाही अशी आठवणही यावेळी करून दिली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहिण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे होते. पण बारामतीकरांना मताच्या स्वरूपात बहिणीला पाठिंबा दिल्याचा टोलाही अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्रात कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला, काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांच्या हातात सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले आठ महिन्यात पुतळा खाली आला. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केलं साठ वर्ष होऊन गेली तरी त्याला काही झालं नाही. तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला लांब जायचं आहे. या तुतारीने संबंध देशात आवाज आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही यावेळी दिला.
मला माहित होतं तुम्हाला तिकडे करमणार नाही – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
तुम्ही स्वगृही येत आहात तुमचं स्वागत. मला माहित होतं तुम्हाला तिकडे करमणार नाही. आता योग्य ठिकाणी आपला राम जायला लागला आहे. राम कधी दिसत नाही, तसा राम आज आपल्याला मंचावर दिसत नाही, पण तो आहे. रामराजे यांच्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं. तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघात तुतारी वाजण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे. संजीवराजे आणि दिपक चव्हाण यांच्या हातात तुतारी देतोय. मला माहिती आहे की, इथे काय अन्याय झाला आहे. पोलीस ठाण्याचा वापर किती टोकाचा झाला आहे. विधानसभा निवडणुका ३ ते ४ दिवसात जाहीर होतील. फक्त फलटण नाही माण खटावची जागा पण तुम्ही निवडून आणा असं आवाहनही यावेळी जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांना केलं.
फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही- खा. अमोल कोल्हे
यावेळी बोलताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, या आधी फलटणला जेव्हा यायचो तेव्हा इथे तुतारी वाजलीच पाहिजे असे वाटायचे. पण अखेर आज योग आला. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी निर्णय घेतला. दीपक चव्हाण आज पक्षात प्रवेश करत आहेत. आता फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, आतापर्यंत तेल, बिस्किट, साखर विकत घेता यायची. परंतु आता आमदार खरेदी करता येतात, हे भाजपाने दाखवून दिले. आमदारांना ईडी, सीबीआय सारख्या संस्थाचा धाक दाखवून यांनी आपल्या लोकांना पक्षात घेतले. पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दिल्लीसमोर गुडघे टेकणं बस्स झालं असे म्हणत ताठ मानेने निर्णय घेण्याचे ठरवले आहे. इकडे हरियाणासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. राज्यात आपली महाविकास आघाडीच जिंकेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya