भाजपाकडून तिसरी २५ उमेदवारांची यादी जाहिरः स्विय सहायकही निवडणूकीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकिट कापले

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी भाजपाने तिसरी २५ उमेदवारांची यादी आज दुपारनंतर जाहिर केली. या उमेदवारांच्या यादीत विद्यमान अनेक आमदारांच्या तिकिटीला कात्री लावण्यात आली आहे. तर अनेक अपेक्षित आणि इच्छुक उमेदवारांचाही भ्रम निरास या तिसऱ्या यादीत स्थान न देता केला.

भाजपाने जाहिर केलेल्या तिसऱ्या यादीत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना बोरीवली मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांनाही भाजपाने उमेदवारी जाहिर केली नाही. याशिवाय घाटकोपरमधून विद्यमान आमदार पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश महेता यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र भाजपाने पुन्हा एकदा पराग शहा यांना तिकिट देत प्रकाश महेता यांचा भ्रम निरास केला.

याशिवाय नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले कारंजाच्या सई प्रकाश डहाके यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. आर्वीतून विद्यमान आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी नाकारत देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले सुमित किशोर वानखेडे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे. सुमित वानखेडे यांच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचे दुसरे स्वीय सहाय्यक आमदार बनण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी अभिमन्यू पवार हे ही देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक म्हणून काम करत होते. आता त्यांना लातूर जिल्ह्यातून मागील वेळी उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. आणि ते निवडूणही आले. त्यानंतर आता त्यांना दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अभिमन्यु पवार यांच्यानंतर आता सुमित वानखेडे आमदारकीच्या निवडणूकीत उतरत आहेत.

मुंबईतील बोरिवली या विधानसभा मतदारसंघातून सुनिल राणे यांच्याऐआवजी संजय उपाध्याय यांना उपाध्याय यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच वर्सोवातून धोक्यात असलेली डॉ भारती लव्हेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर लातूर शहरमधून शिवराज चाकूर पाटील यांच्या स्नुषा डॉ अर्चना शैलेश पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

भाजपाची २५ आमदारांची तिसरी यादी जाहिर

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *