ॲड प्रकाश आंबेडकर यांचे भाकित, विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार तर वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल. हे आपल्याला मान्य आहे का ? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, २०० आमदार विधानसभेत असतील. यांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मराठ्यांनी काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करून घेतले आणि इतर ठिकाणी मराठा विरूध्द मराठा असे चित्र उभे करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये मराठा आमदार कसे निवडून येतील याचीच रचना आखण्यात आली. या खेळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत हे ओबीसींनी पहिले लक्षात घ्यावे. हे लक्षात घेतले नाही, तर आपण हुकणार हे लक्षात घ्या अशी शक्यताही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांचा निर्णय झाला आहे की, मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी मत हे एससी, एसटी, ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लीम उमेदवारांनाच दिले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील असेही यावेळी सांगितले.

निवडणूकीच्या निमित्ताने सध्या सुरु असलेल्या प्रचारावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक प्रचार निश्चित केला जाणार आहे आणि तो म्हणजे धर्म संकटात आहे. मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजपा, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून, आरक्षणाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने थांबवण्यात आल्याचेही नमूद केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *