राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना आता संभावित मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाचा पत्ता कट झालेला असेल याचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहभागी होणाऱ्या आमदारांच्या अंतिम यादीत आपलेही स्थान असावे यासाठी अनेक आमदारांनी सत्तेत आपलाही हिस्सा असावा यासाठी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे.
दरम्यान भाजपामधील सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख हे २०१४ सालच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केले. तसेच सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार मंत्री पद सोपविण्यात आले होते. मात्र यावेळी या भाजपा मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखालील या नव्या मंत्रिमंडळात मात्र या दोन्ही माजी मंत्र्यांना संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. तर या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारांसंघातून तिसऱ्यांदा निवडूण आलेले सचिन कल्याणशेट्टी यांना मात्र राज्य मंत्री पदासाठी संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप अनिश्चितता असून त्यांच्या शेवटच्या क्षणी चंद्रकांत पाटील यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील अतुल सावे यांच्या नावाबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मागील मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. आता त्यांच्या जागेवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होत असून यामध्ये आशिष शेलार यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहेत.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून राज्य मंत्रिमंडळाच्या यादीत अब्दुल सत्तार यांना भाजपाच्या आग्रहामुळे त्यांची गच्छती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यापुढे दिसणार नाहीत याची काळजी स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडूनच घेण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यामुळे मागील सरकारच्या काळात दोन-चार वेळा अडचणीत येण्याची पाळी आली. त्यामुळे त्यांनाही यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात येणार नसल्याचेही बोलले जात आहे. त्याबरोबरच ज्या बंजारा समाजाच्या मतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे जात बंजारा समाजाचे गुण-गाण गायले त्या समाजाच्या संजय राठोड यांचे मंत्रिपदही यावेळी धोकादायक स्थितीत अडकले आहे. मात्र शेवटच्या क्षणी जातीय राजकारणाचा विचार करता संजय राठोड यांना अपवादात्मक स्थितीत मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र यंदाच्या राज्य मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील यांचे नाव मंत्री पदाचे यादीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर संजय बन्सोड आणि अन्य दोन माजी मंत्र्याची नावेही वगळण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात आहे. परंतु दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळात प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्री पदाची मागणी अजित पवार गटाने भाजपाकडे केल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya