मनोज जरांगे पाटील यांचा खोचक टोला, शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर… मराठ्यांच्या मताशिवाय कुणीही सत्तेत बसू शकत नाही

राज्यात संशयातीत बहुमत मिळूनही महायुतीच्या सत्ता स्थापनेला उशीर झाला. तसेच उशीराने का होईना राज्यातील सत्ता स्थापनेचा मुहुर्त अखेर लागला खरा. पण त्यातही खाते वाटपावरून सत्ता स्थापनेच्या आधीच संदोपसंदी सुरु झाल्याचे चित्र राज्याच्या महायुतीमध्ये सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र महायुतीला खोचक टोला लगावत म्हणाले की, शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर आणखी त्यांच लांबलं तर आपल्या शुभेच्छा वाया जायच्या.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणले की, मराठ्यांना आरक्षण द्यावचं लागेल. भरपूर बहुमत मिळालं म्हणून मराठ्यांसी बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही असे सांगत याँव करेन त्याँव करेन असं चालणार नाही. मराठे कुणाच्या बापाला भीत नसतात. मराठा रस्त्यावर उतरला की तुमचं काही खरं नाही, गॅझेट लागू करायचे, मराठा कुणबी एकच आहे, उगाच सत्ता आली म्हणून मस्ती येऊ द्यायची नाही. मराठे कुणाचीही मस्ती टीकू देत नाही तशीच मी पण टीकू देणार नाही असा इशाराही सत्तेत स्थानापन्न होणाऱ्या नव्या राज्य सरकारला दिला.

लाडकी बहिण योजनेवरून सवाल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लाडकी बहिण योजनेनुसार पैसे कुठून आणले? आम्ही फक्त इतके हजार कोटी आणले, हेच ऐकतोय असे सांगत आता अटी घातल्या असून ही योजना बंद करायची आहे का असा सवाल करत हे आमचेच पैसे आम्हाला देऊन अटी घातल्या आहेत. त्या अटी काय आहेत त्या माहित नाही शेत मालाला भाव देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करणार नाहीत. उलट रस्ते फक्त तयार करत आहेत. तसंच समृद्धीला तर नुसती चित्रच आहेत. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. आपण मैदानात असतो तर सुफडाच साफ केला असता असे सांगत परंतु आरक्षण घेणार म्हणजे घेणारंच असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *