राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि भाजपा प्रणित महायुती सरकारला लोकांनीच निवडूण दिले असल्याचा दावा भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षांनी केला. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम मशिन्समधून घोटाळा करून निवडूण आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील सर्वसामान्य जनतेची गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात नवी सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश पद्धत लागू केली. मात्र प्रशासनातील दप्तर दिरंगाईचा फटका बसत असलेल्या पुण्याच्या विजय परबती साष्टे यांनी महसूल विभागाच्या कारभाराला कंटाळून अखेर मंत्रालयातच्याच सातव्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूली कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे वारजे माळवाडी येथीस विजय परबती साष्टे याचे त्याच्या जमिनीशी संबधित एक काम महसूल विभागात होते. जमिनीशी संबधित काम मागील अनेक वर्षापासून रखडले होते. त्यासंदर्भात महसूल विभागात विजय साष्टे हे सातत्याने मंत्रालयात येत होते. त्यामुळे सततच्या येण्या जाण्याला वैतागलेल्या विजय साष्टे हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक पाहता मंत्रालयात एकाच कामासाठी वर्षानुवर्षे खेटे खालणारी सर्वसामान्य जनता आहे. मात्र दरवेळी नव्या सरकारचा मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ सत्तेत विराजमान झाले की, जनतेची स्थानिक कामे स्थानिक पातळीवरच व्हावीत आणि मंत्रालयात येणारी जनतेची गर्दी कमी व्हावी यासाठी वेगवेगळ्या पातळीवर घोषणाही करण्यात येते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कितीही घोषणा केलेल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर होताना दिसत नाही. त्यामुळेच त्याची दाद मागण्यासाठीच जनता शेवटी मंत्रालयात येत असल्याचे आतापर्यंत दिसून आहे.
अखेर या पार्श्वभूमीवर भाजपा प्रणित महायुती सरकारला मिळालेल्या जनतेच्या मिळालेल्या कौलाचे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गर्दी कमी करण्याच्या संकल्पनेचा चांगलाच बोऱ्या वाजल्याचे दिसून येत आहे.
वार्ताकंनावरून पत्रकार आणि पोलिसांमध्ये वादः पत्रकारांचे धरणे आंदोलन अखेर शिंदे यांची मध्यस्थी
विजय साष्टे याने राज्य मंत्रिमंडळाच्या दिवशीच मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून सुऱक्षा जाळीवर उडी मारली. त्यावेळी मंत्रालयातील वार्ताकंनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांची एकच धावपळ उडाली. या धावपळीतच पत्रकार आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यावर आम्ही काय जनतेच्या बातम्या द्यायच्या नाहीत का असा सवाल करत पत्रकारांनी धक्काबुकी करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच सदर पोलिसावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत मंत्रालयातीलच डीसीपी केबिनच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. अखेर या पत्रकारांच्या या धरणे आंदोलनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत या पोलिस आणि पत्रकारांच्या वादात मध्यस्थी केली. एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर पत्रकारांच्या प्रश्नी पोलिस आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची आदेश दिले. त्यानंतर पत्रकारांनी सुरु केलेले आंदोलन स्थगित झाले.
Marathi e-Batmya