सतेज बंटी पाटील यांचा सवाल, शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ? शक्तिपीठ महामार्गाऐवजी मार्गावरील मंदिरांना ५-५ हजार कोटींचा निधी द्या

शक्तीपीठ प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही. तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? असा सवाल काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी यावेळी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतल्यानंतर काँग्रेसचे संतेज बंटी पाटील बोलत होते.

सतेज बंटी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ८६ हजार कोटी रूपये खर्चून होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गातून टोल वसूल करण्यासाठी ३ हजार दरवर्षी याप्रमाणे किमान २८ वर्ष लागतील आणि यासाठी दरवर्षी ६० लाख वाहने या रस्त्याने गेली पाहिजेत तरच त्याचा खर्च वसूल होईल अशी वस्तुस्थितीही यावेळी मांडली.

पुढे बोलताना सतेज बंटी पाटील म्हणाले की, त्याऐवजी नागपूर- गोवा महामार्गावर जी जी शक्तीपीठे येणार आहेत त्या मंदिराच्या विकासासाठी ५-५ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांचा विकास करावा अशी मागणी करत शक्तीपीठांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुखसोयी उपलब्ध करून तीर्थक्षेत्रांचा विकास साधला येईल असेही यावेळी सांगितले.

सतेज बंटी पाटील म्हणाले की, शक्तीपीठाच्या अट्टाहासाखातर राज्यातील २७ हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकू नका अशी आर्जव करताना शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचा वटहुकुम सरकारने काढला असाताना पुन्हा तो राबवला जात आहे ही नागरीकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक नाही काय ? असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना आमदार सतेज बंटी पाटील म्हणाले की, राज्यभरात शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तरीही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा विषय येतो हे दुर्दैव असून त्याविषयीचा खेद व्यक्त केला.

About Editor

Check Also

संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *