विरार मधील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू नारंगी फाटा येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत रात्री अचानक कोसळली

विरार मधील नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊंडच्या स्वामी समर्थ नगरातील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत काल बुधवारी गणेश चतुर्थीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका बाजूला कोसळली. या इमारतीमध्ये १५ ते २० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या मलब्याखालील नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण संध्याकाळपर्यंत यातील १७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित करण्यात आली होती. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. पंरतु रात्री इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली.

रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना रेस्क्यू करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे.

दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिकांनी ही इमारतखाली केली नव्हती. पालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. चाळींच्या मध्यभागी होती त्यामुळे मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा निर्माण होत होता. मोठे जेसीबी तिथे पोहोचू शकत नसल्याने मलबा काढणे अवघड झाले होते.

About Editor

Check Also

आशिष गुप्ता यांचे मत, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य

शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *