काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला.
तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका केली. तसेच कर्नाटकातील मतचोरीच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारासह इतर उमेवारांनी तक्रारी केल्यानंतर कर्नाटक पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या प्रकरणावर कारवाई होऊ नये यासाठी स्वतः निवडणूक आयोगानेच पुढाकार घेत सीआयडीला तपास करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोपही केला.
कर्नाटक सीआयडीने १८ महिन्यांत १८ पत्रे लिहून सर्व गुन्हेगारी पुरावे – सीईसीने ब्लॉक करण्याची विनंती केली आहे.
After our Aland candidate exposed the fraud, the local EC official filed an FIR, but the CID investigation has been – BLOCKED by CEC.
The Karnataka CID has written 18 letters in 18 months requesting all incriminating evidence – BLOCKED by CEC.
The Karnataka EC has sent multiple… https://t.co/l6vOv2nNga
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2025
राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणूक आयोगाने सीईसीने ब्लॉक केलेल्या तपासाचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक विनंत्या पाठवल्या आहेत. डेस्टिनेशन आयपी, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सची माहिती सीईसीने ब्लॉक केली.
जर ही मत चोरी पकडली गेली नसती आणि ६,०१८ मते हटवली गेली असती, तर आमचा उमेदवार निवडणूक हरला असता. सीईसी ज्ञानेश कुमार – सबबी देणे थांबवा. कर्नाटक सीआयडीला पुरावे आताच देण्याची मागणीही केली.
या सर्व आरोपावर केंद्रीय निवडणूक आय़ोगाच्या फॅक्ट चेक यंत्रणेने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला चुकीचे असल्याचा स्टॅम्प मारत तो एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. तसेच राहुल गांधी यांच्या आरोपाच्या पुढे निवडणूक आयोगाने काही उत्तरे देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
Marathi e-Batmya