टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये मात्र काही महिला परिक्षार्थींना मात्र वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. परिक्षा केंद्रातील नियम म्हणून त्यांना त्यांच्या गळातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगितल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून आवाज उठविला. तर त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

शिक्षक पात्रता परिक्षेसाठी गेलेल्या महिला उमेदवारांच्या गळ्यातील मंगळसूत्रा सहित सर्व दागिने काढून ठेवण्यास सांगण्यात आले. यावरून अंबादास दानवे म्हणाले की, विचित्र विरोधाभास. हिंदूत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिला मंगळसूत्र काढून परिक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षाच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपी यातला फरक कळत नाही. बहुदा आपली संस्कृती की सरकारी दडपशाही ? ही परिक्षा हिंदूस्थानात सुरु आहे की पाकिस्तानात नाही असा संतापही यावेळी व्यक्त केला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात मागच्या काळातही तक्रारी आल्या होत्या, यासंदर्भात मी माहिती घेईन मागच्या वेळी असा विषय झाला होता. तेव्हा परिक्षेचं आयोजन करण्यारांनाही सांगितलं होतं की असे अनुभव आले की वेगवेगळ्या गोष्टीमध्ये साहित्य लपवले जाते. त्यातून चिटींग केली जाते. तथापि अशा पद्धतीने मंगळसूत्र काढून घेणं योग्य नाही. परंतु याची आधी काळजी घेणं गरजेचे आहे. याबाबत सूचना दिल्या जातील आणि चौकशी केली जाईल असे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;

जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *