प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी नियोजनाच्या अभावावर व्यक्त केला संताप

गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ॲड . प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, शासनाच्या नियोजनशून्यतेवर टीका करताना म्हणाले की, “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत म्हणाले की, “गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ उपाययोजना करून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी,” अशी मागणीही केली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

About Editor

Check Also

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *