तूर खरेदी केंद्र बंद होणार नाहीत आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नये अशा सूचना बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे खरेदी केंद्र बंद होणार नसल्याची ग्वाही देत खरेदीचे चुकारे दिले जातील, अशी माहीती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करतांना मंत्री देशमुख म्हणाले की, या हंगामात तूर, सोयाबीन, हरभरा, मुग, उडीद खरेदी सुरू आहे. यावर्षी देखील साडे चार लाख मेंट्रीक टन तूरीची खरेदी केली जाईल.

आतापर्यंत एक लाख ५ हजार शेतकऱ्यांची सुमारे १२ लाख ६९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मूग ५४ हजार ३४१ क्विंटल, उडीद ५ लाख ८६ हजार क्विंटल, सोयाबीन २ लाख ६२ हजार क्विंटल तर हरभरा ४ हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्वाची भूमिका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *