मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ७ जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. प्रधानमंत्री पिक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण …
Read More »फळे व भाजीपाल्यासाठी कीटकनाशके आणि हार्मोन्सचा अनावश्यक वापर करू नका केंद्रीय कृषी मंत्रालय अहवालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषीमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचा वापर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातून हिरवी मिरची निर्यात केली जाते. अलीकडे या निर्यात केल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीचे नमुने …
Read More »तुर खरेदीप्रश्नी सहकारमंत्री देशमुख यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही
नवी दिल्ली : प्रतिनिधी शेतक-यांची तुर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तुर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असुन शेतक-यांनी तुर खरेदीबाबत आश्वस्त राहावे असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन …
Read More »फळपिकांचा क्रॉपसॅप योजनेत समावेश करण्याचा निर्णय ४१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्याची कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाचे दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या चालू वर्षापासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण …
Read More »राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना देणार ‘महावेध’ २०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित
मुंबई : प्रतिनिधी लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली आहे. ही अचूक माहिती मिळण्याकरीता ‘महावेध’ ही योजना सुरु करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि नुकसान टाळण्यासाठी मदत …
Read More »मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील महत्वाची बाजारपेठ असून मुंबई बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आज पणनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार …
Read More »खरीप हंगामासाठी कापूस बियाण्यांची २ कोटी पाकीटे उपलब्ध कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी खरीप २०१८ मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या माध्यमातून २ कोटी पाकीटे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार असून साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाणांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर …
Read More »जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार
मुंबई : प्रतिनिधी जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे उद्घाटन येत्या दिनांक १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार …
Read More »५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास मंजुरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बँकर्स समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी बँकर्स समितीच्या २०१८-१९ च्या ५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी ८५ हजार ४६४. ४७ कोटी रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात १०.७० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री …
Read More »दुधाला किमान आधारभूत दर देण्यासाठी कायदा करणार आमदार बच्चु कडू यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पदुम मंत्री महादेव जानकर
मुंबई : प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याद्वारे ऊस पिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व …
Read More »
Marathi e-Batmya