सरकारी अभियांत्रिकी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने आपला नफा सरकारला दिला आहे. भेलने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून केंद्र सरकारला ८८ कोटी रुपये दिले आहेत. भेलमध्ये भारत सरकारचा ६३.१७ टक्के हिस्सा आहे. लाभांशाचा धनादेश आज भेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नलिन शिंघल यांनी केंद्रीय अवजड उद्योग …
Read More »विलंबित आयटीआर कोणी भरावा आणि अंतिम मुदत काय? दंडासह इतर नियम जाणून घ्या
तुमची आयटीआर भरण्याची ३१ जुलैची अंतिम मुदत चुकली असेल, तर तुम्ही विलंबित आयटीआर दाखल करून आयकर विभागाची कारवाई टाळू शकता. आयकर विभागाने अशा करदात्यांना विलंबित आयटीआर भरण्याची संधी दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र, उशीरा आयटीआरसाठी दंड भरावा लागेल. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी …
Read More »सहा बँकांचा एफडी गुंतवणूकदारांना झटका ठेवींवरील व्याज दर घटवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दर कायम ठेवू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याआधीच देशातील सहा बँकांनी एफडीचे दर कमी करून ग्राहकांना इटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. हा बदल …
Read More »एलपीजी सिलिंडरची सबसिडी ३०० रुपयांनी वाढली उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या २०० रुपयांच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता ही सबसिडी प्रति एलपीजी सिलिंडर ३०० रुपये होणार आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. किमतीत कपात आणि सबसिडी वाढल्यानंतर उज्ज्वला लाभार्थींना एलपीजी सिलिंडर …
Read More »या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण? दोन्ही गटांकडून दावा रायगड- नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाचा तिढा कायम
शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसले असताना बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा तिढा सुटलेला नाही. तो अद्यापही कायम आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू …
Read More »पीक विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, संवेदनशीलपणे मदत करा कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री दादाजी भुसे, अनिल पाटील
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना दिले. वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन …
Read More »ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जीपीएफ व्याजदर जाहीर इतके मिळेल व्याज
अर्थ मंत्रालयाने बुधवारी जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच जीपीएफ (GPF) चे व्याजदर निश्चित केले आहेत. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) आणि तत्सम भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर कोणतेही बदल न करता स्थिर ठेवले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत केंद्र सरकारने जीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आणि …
Read More »मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी बांधणार ४० हजार शौचालये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यार्थ्यांसह घेतली राज्यपालांची भेट राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात
राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य शासनाला याप्रश्नी वारंवार सांगूनही त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्याने राज्यपाल महोदयांनी यात हस्तक्षेप करुन या विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी …
Read More »पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुम्हीही घरी आणू शकता किंमत १०० रुपयांपासून सुरू
अनेकदा तुम्ही पाहत आहात की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशात किंवा परदेशात जातात तेव्हा त्यांना अनेक वस्तू भेटवस्तू म्हणून मिळतात. यामध्ये चित्रे आणि स्मृतिचिन्हांसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आता तुम्हाला पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तू तुमच्या घरी आणण्याची संधी आहे. अशा ९१२ भेटवस्तूंचा लिलाव होत असून त्यांचा ई-लिलाव गांधी जयंती …
Read More »
Marathi e-Batmya