काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्या नियमबाह्य वागणूकीमुळे निर्माण झालेल्या राजकिय पेच प्रसंगावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र कदाचित त्याचा अंदाज कोश्यारी यांना असावा त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या मागे लागून राज्यपाल पदावरून पदमुक्त करून घेतले. त्यांच्या ठिकाणी राज्याच्या राज्यपाल (Governor ) पदी …
Read More »माधव भांडारी म्हणतात, सामान्य माणसाकडून दोन हजाराच्या नोटा वापरण्याचे प्रमाण अल्प… डिजिटल प्रक्रियेमुळे एकूणच सामान्य माणसाचे रोखीचे व्यवहार कमी झाले
दोन हजारांच्या नोटेचा वापर मर्यादित करण्यात आला आहे, ही नोट रद्द करण्यात आलेली नाही. ज्यांना या नोटा बँकेत जमा करताना त्याचा हिशोब देण्यात अडचण होणार आहे , ती मंडळीच या निर्णयाबद्दल आरडाओरड करत आहेत. सामान्य माणसाची या निर्णयामुळे गैरसोय होणार नाही , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव …
Read More »नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?
वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …
Read More »समीर वानखेडे यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा, मात्र ‘या’ अटींवर पुढील सुनावणी ८ जूनला होणार
कार्डीलिया क्रुजवरील कारवाई दरम्यान सिने अभिनेता शाहरूख खान याच्या मुलगा आर्यन खान याच्यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. मात्र या आर्यन खान याला बाहेर सोडण्यासाठी शाहरूख खानकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याप्रकरणाची ठपका एनसीबीने वानखेडे यांच्यावर ठेवला. त्यानंतर भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल …
Read More »‘शासन आपल्या दारी’ला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केली. …
Read More »महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »सुप्रिया सुळे पहिल्यांदाच म्हणाल्या, मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार… एका बॉलीवूड स्टारच्या मुलाचे असे हाल तर सर्वसामान्यांचे काय
कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा …
Read More »आशिष शेलार म्हणाले, …म्हणून उद्धव ठाकरेंना नाकारले…५० चा आकडाही पार नाही करू शकत राज ठाकरे यांनाही दिला इशारा
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० …
Read More »डिएनए टेस्ट करावी लागेल, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर भाजपा-भाजपा युतीतही हा प्रश्न आला होता
कर्नाटक राज्याचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होत होत्या. या सभेच्यावेळी मविआतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून जी भूमिका मांडली जायची नेमक्या त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भूमिका मांडली जात होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीत निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र कर्नाटक विधानसभेचा …
Read More »जी-२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देवून स्वत: जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता …
Read More »
Marathi e-Batmya