राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणात या क्षेत्रात ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासक, तज्ञ प्रतिनिधी, कंपन्यांचे संचालक, नॅसकॉम, टेलिकॉम उद्योगाचे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत समुह पुनर्विकास धोरणासह या गोष्टींना मान्यता ठाण्याच्या धर्तीवर मुंबई महापालिका हद्दीत समुह पुनर्विकास
मुंबईतील समूह पुनर्विकासाला मोठे प्रोत्साहनः अधिमूल्यात ५० टक्के सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन देण्यासाठी अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलतीचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३ …
Read More »पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत“आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. …
Read More »नवीन कामगार नियमांना राज्य सरकारने दिली मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय
केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), २०२० या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने …
Read More »राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी …
Read More »संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटात बिगडले? खा अरविंद सावंत यांनी दिली चर्चेची माहिती ऑगस्ट महिन्यात संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची बैठक होणार
साधारणतः वर्षभरापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात शिवसेनेच्याच ४० आमदारांनी बंड पुकारत भाजपाशी सवता सुभा केला. त्यानंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडने युती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेड आणि उध्दव ठाकरे यांच्यात आज मंगळवारी ३० मे शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याची …
Read More »राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी शिखर संनियंत्रण समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर
राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्संच्या विकासाला अलिकडच्या काळात प्राधान्यक्रम दिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविध औद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी २३९ प्लॉट वितरित केले होते. त्यातील महाराष्ट्रात शेंद्रा-बिडकीन येथे २०० प्लॉटचे वितरण केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी …
Read More »स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व औषधी …
Read More »मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती
मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या …
Read More »चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचे निधनः काँग्रेससह या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली दिल्लीतील मेदांता रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मृत्यूसमयी बाळू धानोरकर यांचे वय ४७ वय होते. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, …
Read More »
Marathi e-Batmya