Editor

संजय राऊतांचा राणेंवर पलटवार, तो पादरा पावटा आहे… पळून गेलो आणि लढायच्या गोष्टी करतोय

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली असून संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. …

Read More »

ठाकरे गटाच्या भाकितावर आता शिंदे गटाच्या आमदारानेही केले मोठे वक्तव्य उध्दव ठाकरे गटातील सर्व आमदार शिंदे गटात येणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार लथवून टाकले. त्यानंतर ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडण्यात जात नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार असल्याचे भाकित करत शिंदे गटातील अनेक आमदार …

Read More »

नारायण राणे म्हणाले, मी उध्दव ठाकरेंना भेटणार…तर राऊतांना चपलेने मारतील संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी येऊन मला.. यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कधीच राजकिय शत्रुत्व असल्याचे दिसून आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून नारायण राणे आणि संजय राऊत यांना गंभीर इशारा दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला …

Read More »

जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबई …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, मोदी सरकारने कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व अधिकार दिले पण मोदी सरकारने कामगार चळवळीचे अस्तित्व संपवण्याचे काम केले असून मालकधार्जिणे कायदे आणून कामगार …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला, मुख्यमंत्री भाजपाच्या कुटील डावाला बळी पडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा

महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपाच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश …

Read More »

अतुल लोंढेचा सवाल, भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये अवैज्ञानिक विचारांची मांडणी कशासाठी? रांगोळीने दुष्टशक्ती येत नसेल तर कांचन गडकरी व कल्पना पांडेंना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवा

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन वुमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व श्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगितले तर भाजपा नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नाहीत असे सांगितले. रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर …

Read More »

किरीट सोमय्या यांची माहिती, संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट शिवडी न्यायालयाने दिले आदेश

सुलभ शौचालय उभारणीत घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर केला. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र वांरवार सुनावली संजय राऊत हे गैरहजर रहात असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी …

Read More »

शिंदे गटातील प्रवेशावरून संजय राऊत म्हणाले, मेंढर पकडायची अन्… नाशिकमधील ५० पदाधिकारी शिंदे गटात गेल्याच्या प्रश्नावर राऊतांचे उत्तर

उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संघटना बांधणीच्या कामासाठी सध्या नाशिक दौऱ्यावर असतानाच आज ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार करत असलेली कामे लोकांना आवडत असल्याने कार्यकर्त्ये प्रवेश करत आहेत. त्यांना विश्वास वाटत असल्यानेच असे पक्षप्रवेश सोहळे पार पडत …

Read More »

त्या डिलीट केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, जो तुम करते हो… चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

मागील काही दिवसांपासून आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरून नंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटो ट्विट करत टीका …

Read More »