Editor

आता सर्व शासकिय पत्रांवर बोधचिन्हाबरोबर राहणार “जनहिताय सर्वदा” घोषवाक्य घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे …

Read More »

अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या सय्यद शेहजादी

अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत शासन राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रम आखला असून, या कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच दर तीन महिन्याने आढावा घेण्यात यावा, अशा सूचना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (भारत सरकार) सदस्या …

Read More »

अजित पवारांचा इशारा, संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर खपवून घेणार नाही राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार; अजित पवार यांची माहिती...

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली अशी …

Read More »

सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले, मला कामकाजाबाबत सांगू नका, हे मी ठरवेन संतापून वकील विकास सिंह यांना झापलं

मागील काही वर्षात न्यायालयातील अपूऱ्या न्यायाधीशांची संख्या असतानाही तत्कालीन सरन्यायाधीश यु यु लळीत आणि विद्यमान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे प्रलंबित असलेल्या खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला सूचिबद्ध करण्यावरून सरन्यायाधीशांकडे आग्रह धरला. यावेळी संतापलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड …

Read More »

ठाकरे विरूध्द शिंदे, संघर्षावरील सुनावणी आता व्हेलॅनटाईन डे च्या दिवशी ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उभी फूट पाडत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष आमदार सोबत गेले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणी पोटी उध्दव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव …

Read More »

उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना टॅग करत डिवचलं, ….चित्रा मेरी सासू चित्रा वाघ यांचे थेट अंबाबाईला साकडं

बिग बॉस फेम, अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्र-विचित्र फॅशनमुळे चर्चेत आहे. त्यातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तोकड्या कपड्यांवरून उर्फीवर टीकेची झोड उठवित कारवाई करण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना पत्र देत उर्फी जावेदवर कारवाईची मागणी केली. तसेच महिला आयोगाकडे दादही मागण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

नोटीस मिळाल्यावर ठाकरे गटाचे देशमुख म्हणाले, मी चौथ्या नोटीसीची वाट बघतोय… यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप

गुजरातमधल्या सूरतहूनच शिंदे गटातून माघार घेतलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. एसीबीची नोटीस मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, मला आतापर्यंत तीन नोटीसा …

Read More »

बीडीडी चाळकऱ्यांना मिळणार आता मासिक भाडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्या

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. मात्र या आढावा बैठकीत बीडीडीतील रहिवाशांना मासिक भाडे देण्याचा निर्णय घेत चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, तुटपुंजी रक्कम देऊन सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आक्रमक

अतिवृष्टी,संततधार आदींमुळे त्रस्त शेतकरी मदतीकडे आस लावून बसला असताना पीकविम्याची तुटपुंजी रक्कम देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर हल्लाबोल केला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवार जाहिर भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, जणगणनेचा अधिकार केंद्र सरकारलाच

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …

Read More »