Editor

मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, या सहा ठिकाणी कामगारांच्या रुग्णालयांसाठी जमीन उपलब्ध करून द्या केंद्रीय पर्यावरण, वने, कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून आढावा

महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी …

Read More »

ठाकरे गटाचे वकील म्हणाले, शिंदे गटाचा वाद म्हणजे लोकशाहीची थट्टा आयोगासमोर युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून निवडणूक आयोगात पोहोचलेला वादावर १७ जानेवारीनंतर आज २० जानेवारी रोजी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आज युक्तीवाद केला. या आधीच्या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असल्याचे सांगत पुढील तारखेची मागणी केली होती. त्यानुसार आज कपिल सिब्बल यांनी …

Read More »

तरूणांसाठी खुषखबरः शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांसाठी भरती, जाहिरात प्रसिध्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार- अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर

महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष …

Read More »

संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर म्हणाले, डरो मत हा आमचा… यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना मारली मिठी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचताच त्यावेळी तीन महिन्यापासून तुरुंगात असलेले उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होत ते तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत …

Read More »

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब त्यांची देणी तातडीने देण्याची खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी

मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद …

Read More »

२६ जानेवारीला राजपथावर पुरोगामी महाराष्ट्राकडून शक्तीपीठांचा चित्ररथ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर …

Read More »

अतुल लोंढेचा आरोप, दावोसमध्ये करार केलेल्या कंपन्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्या दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …

Read More »

एम.फील.अध्यापकांना मिळणार ‘कॅस’चे लाभ

११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रगतीचं सरकार पण मोदींच्या मार्गदर्शनानुसार काम करतो… केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांची …

Read More »

BMC-MMRDA चे हजारो कोटींचे अर्थसंकल्प तर पंतप्रधानांचे निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेट्रोसह अन्य विकास कामांचा शुमारंभ करताना दिले

मुंबईतील मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यकाळातील विकासासाठी मुंबईला तयार करण्याचे काम …

Read More »