योगगुरू आणि पतंजलीचे प्रमुख बाबा रामदेव हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत असतात. मात्र आता तर त्यांनी महिला विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितच वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. रामदेवबाबाच्या या वक्तव्यावरून महिला वर्गात संतापाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. पतंजलीच्या …
Read More »अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार
राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्घाटन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी 5 …
Read More »सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देणार
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे घोषणा, सातारा जिल्ह्यात ५०० एकरावर कृषी उद्योग
महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक …
Read More »राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…
अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या तोंडावर …
Read More »आनंद तेलतुंबडे जामीन प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगांव दंगलप्रकरणी ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक डॉ.आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या जामिनाच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तेलतुंबडे यांचा जामीन रद्द करावी अशी याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनआयएने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत मुंबई …
Read More »प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..
काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. …
Read More »महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांची तयारी
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितास दिले. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात …
Read More »ईडीचे वाईट दिवसः न्यायालय म्हणते संजय राऊतांच्या जामीनावरील याचिका ऐकू शकत नाही
पीएमएलए अर्थात ईडी न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या कथित पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र ईडीने याप्रकरणी तातडीने संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास निकाल दिला. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने सुधारीत याचिका दाखल करत …
Read More »
Marathi e-Batmya