शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचा दौरा केलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आता एकदिवसीय बिहारच्या दौऱ्यावर उद्या बुधवारी जात आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिली. यावेळी आदित्य …
Read More »राहुल गांधी यांनी भावनिक होत दिला महाराष्ट्रातील जनतेला संदेश
कन्याकुमारीहून सुरु झालेली भारत जोडो यात्रा मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून प्रवास करत मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे गेली. मात्र या १४ दिवसात महाराष्ट्रात मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भावनिक होत महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. काय दिला संदेश महाराष्ट्रातील जनतेला वाचा त्यांच्याच शब्दात…. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा …
Read More »उद्धव ठाकरेंच्या विरोधातील “ती” याचिका न्यायालयाने तुर्तास फेटाळली
छापखान्याच्या आधारे इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती कशी जमा केली? असा प्रश्न विचारत उध्दव ठाकरे यांच्या मालमत्तेची तपासणी करावी या मागणीवरून दादरच्या गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज अखेर न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. उद्धव ठाकरे आणि यांच्या कुटुंबियां विरोधात बेहिशेबी मालमत्ता …
Read More »ठाकरे गटात पुन्हा दोन तट
कोकणातील नियोजित रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार होता. मात्र स्थानिक नागरीकांच्या रेट्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास विरोध करत फडणवीस सरकारला नाणार येथून तो प्रकल्प रद्द करायला लावला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बारसू येथे करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटात पुन्हा दोन तट …
Read More »साई रिसॉर्टचे पाडलेच नाही ! आता परबांचे सोमय्यांना खुले आव्हान
शिवसेना-ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. मात्र,सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कथित साई रिसॉर्टचे पाडकाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांनी खुले आव्हान दिले. याबाबत अधिक …
Read More »भाजपा म्हणते, त्या एका वक्तव्यावरून राज्यपालांना कोंडीत पकडू नका
भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची …
Read More »कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती
राज्यातील खासगी पद्धतीने व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन करतांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे अध्यक्ष हे पशुसंवर्धन आयुक्त असून …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देणार
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी …
Read More »दुग्ध व्यवसायासाठी सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेन्मार्कशी चर्चा
दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे …
Read More »ठाकरेबरोबरील शत्रुत्व इतके की लटकेंच्या शपथविधीला दोन्ही सभागृहाचे नेतेच गैरहजर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या बंडखोरीवरून शिंदे-भाजपावर ठाकरे गटासह इतर राजकिय पक्षांकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मोठ्या प्रमाणावर संबध ताणले गेले. या संबध …
Read More »
Marathi e-Batmya