Editor

राहुल गांधी यांचे मोदींना खुले आव्हान, ५५ तास नाहीतर ५ वर्षे ईडीत बसवलंत तरी… रामलीला मैदानावरून राहुल गांधीने फुंकले रणशिंग

कोरोना नंतरच्या काळात देशातील सातत्याने वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेली जीएसटी आणि वाढती बेरोजगारी आदी प्रश्नावरून आज नवी दिल्लीतील रामलीला मैगानावर मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून हल्लाबोल रॅली काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या ईडी चौकशीवरून आव्हान दिले. पंतप्रधान मोदी …

Read More »

भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर, कोण तो रामदास कदम? कृतघ्न माणूस… राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करणे आता जवळपास बंद केले असून त्यांना अनुल्लेखाने मारण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर …

Read More »

अभिनेते प्रकाश राज यांनी अर्थमंत्र्यांना सुनावलं, उध्दटपणा खपवून घेणार नाही ट्विट करत अर्थमंत्री सीतारामन यांच्या वागणूकीवरून सुनावलं

देशात जवळपास पाच ते सहा फिल्म इंडस्ट्रीज आहेत. मात्र राज्याच्या स्वाभिमानावरून किंवा राजकारण्यांच्या चुकिच्या वर्तणूकीवरून एकही बॉलीवूड सितारा किंवा मराठीतील अभिनेते-अभिनेत्री भाष्य करण्यास धजावत नाहीत. मात्र दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज हे वेळोवेळी आपली प्रखर मते ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. काल तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका रेशन दुकानदाराला …

Read More »

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथवून टाकल्यानंतर भाजपा नेत्यांकडून सातत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यातच गणेशोत्सवानिमित्त तर २४ तासाच भाजपाच्या तीन नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री …

Read More »

शिंदे गट आणि शिवसेने दरम्यान मिरजेत बुलढाण्यासारखी घटना होता होता राहिली पोलिसांनी सामोपचाराने चर्चेतून काढला मार्ग

मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून प्रत्यक्ष संघर्ष टाळत फक्त एकमेकांवर टीकाच करत होते. मात्र आज बुलढाण्यात ठाकरे गटाच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घालत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जखमी केले. अगदी तशीच परिस्थिती आज संध्याकाळी मिरज येथे होता होता राहीली. मात्र पोलिसांनी वेळीच …

Read More »

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पडळकरांना म्हणाले, ..तुमचं डिपॉझिट वाचलं का? माझ्या मतदारसंघात येऊन माझ्यावर टीका करता

भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर आरोप करतात. मात्र यावेळी पहिल्यांच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलंश लंके यांच्या मतदार संघात जात पवार कुटुंबियांबरोबरच निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडले. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला निलेश लंके यांनीही पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या मर्यादा ओलंडल्या नाही पाहिजे असे सांगत …

Read More »

रामदास कदम म्हणाले, तर ८-१० वर्षात शिवसेनेचं काही शिल्लक राहीलं नसतं अजित पवार यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचे वक्तव्य

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

अजित पवार म्हणाले; …एकदम ओक्केच झालं, आता काय बोलायचं श्रीगोंद्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परिस्थिती कोणतीही असो त्यावर परखडपणे भाष्य करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तवादी चित्र मांडत हास्यविनोद करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले …

Read More »

मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा मुंबई दौरा, नेमके कारण काय? राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवल हे आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले. तसेच मुंबईत आल्या आल्या त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सर्वात आधी भेट घेतली. त्यानंतर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला, मोदींच्या रेषेपेक्षा मोठी रेष ओढा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निवडक नेत्यांची बैठक

राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पहायला मिळाले. तस काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू …

Read More »